in

गोवा, मुंबईतील काही ठिकाणी ‘एनसीबी’ची छापेमारी

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (एनसीबी) मुंबई आणि गोव्यातील काही ठिकाणी छापेमारी केली आहे. याठिकाणांहून अनेक ड्रग्ज तस्करांना ताब्यात घेतलं आहे. काही विदेशी लोकांनाही ड्रग्जप्रकरणी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून ड्रग्ज ताब्यात घेतले आहेत.

समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील टीमनं गोव्यातील विविध ठिकाणी छापेमारी केली. आमच्या टीमनं काही विदेशी लोकांसह अनेक ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. सकाळपासून छापेमारी सुरू होती. आता आमची टीम दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे, अशी माहिती समीर वानखेडे यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला बोलताना दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Budget 2021: आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

लग्नसमारंभ, लोकलगर्दीमुळे कोरोना प्रादुर्भाव वाढला