in

वांद्रेतील ड्रग पुरवठा करणाऱ्या तरुणाला NCB कडून अटक

मुंबईच्या वांद्रे, खार आणि अंधेरी या भागांमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा करणारा 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला मुंबई NCB नं वांद्रा परिसरात छापेमारी करत असताना अटक केली आहे. या आरोपीकडून ड्रग्ज आणि 2.30 लाख रोकडही जप्त करण्यात आली आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. या तरुणानं कम्प्यूटरच्या CPUमध्ये ड्रग्ज लपवून ठेवले होते.

आरोपीचं नाव अयान सिन्हा असं आहे. या तरुणानं आपल्या घरामध्ये दोन कुत्रेही पाळलेले होते. एनसीबीची टीम घरात जाताच हे कुत्रे त्यांच्या अंगावर धावून येऊ लागले मात्र एनसीबीने आपली कारवाई सुरुच ठेवली. एनसीबीनं आरोपीचा मोबाईल फोन, कम्प्यूटर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि ड्रग्ज मोजण्याची मशीन जप्त केली आहे. हा तरुण ड्रग्ज विकण्यासाठी फेक फेसबुक अकाऊंटचा वापर करत होता. तर, ऑनलाईन पद्धतीनं याचं पेमेंट केलं जायचं. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला चार दिवस पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

आरोपीनं ड्रग्ज पुरवठा करण्याचं काम लॉकडाऊनच्या काळात सुरू केलं आणि यातून भरपूर पैसेही कमावले. अयानला ताब्यात घेतल्यानंतर एनसीबीनं मंगळवारी संध्याकाळी वांद्र्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली. अटक करण्यात आल्यानंतर अयान सिन्हानं चौकशीदरम्यान अनेक कलाकारांची नावं घेतली आहेत, ज्यांना तो अमली पदार्थांचा पुरवठा करत होता. या प्रकरणात तो एकटाच नसून ही संपूर्ण साखळी आहे आणि त्याच्यासोबत अनेक लोक जोडले गेले असून त्यांचा तपास सुरू असल्याचं एनसीबीनं सांगितलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

West Bengal Assembly Polls | भाजपच्या उमेदवार यादीतून मिथुनदा गायब!

शरद पवारांबद्दल टि्वटरवर आक्षेपार्ह मजकूर; दोघांवर गुन्हा दाखल