in ,

समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाशी संबंध – नवाब मलिक

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर याच प्रकरणावरुन सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यामधील वाद मागील काही आठवड्यांपासून सुरु आहेत.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे दररोज एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबाबत पत्रकार परिषद घेऊन एक-एक नवीन खुलासे करत आहेत. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी सादर केलेली काही कागदपत्रे खोटी असल्याचा दावा केला. तर आज निनावी पत्र एनसीबीच्या डीजीकडे पाठवल आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. तसेच समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मलिक यांनी वानखेडे, के.पी. गोसावी, प्रभाकर साईल आणि वानखेडेंच्या चालकाच्या सीडीआर तपासणीची मागणी केली आहे. इलेक्ट्रॉनिक तपास झाल्यास काही शंका राहणार नाही, असं मलिक यांचं मत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…म्हणून ‘सरदार उधम’ ऑस्करमधून बाहेर

Petrol-Diesel Rate Today | किती वाढले आहेत आज इंधन दर?