in

ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला अटक; एनसीबीची कारवाई

Share

लोकशाही न्यूज नेटवर्क

ड्रग्ज पेडलर करण संजानी याच्याशी झालेल्या व्यवहारासंदर्भात समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) बुधवारी अटक केली. समीर खान हे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई आहेत
गेल्या आठवड्यात एनसीबीने चेंबूर आणि वांद्रे येथे छापे टाकून करण संजानी, राहिल फर्निचरवाला आणि साहिस्ता फर्निचरवाला यांना अटक केली होती. त्यांच्याकडून २०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. समीर खान आणि करण संजानी यांच्यात ‘गुगल पे’च्या माध्यमातून व्यवहार झाला होता.

हा व्यवहार २० हजार रुपयांचा होता आणि तो नेमका कशासाठी झाला? ड्रग्जसाठी हा व्यवहार झाला आहे का, यासंदर्भात एनसीबीने बुधवारी जवळपास १० तास समीर खान यांची चौकशी केली. त्यानंतर अटकेची कारवाई केली. याआधी करण संजानी याच्या चौकशीच्या आधारे प्रसिद्ध मुच्छड पानवालाचा मालिक रामकुमार तिवारी याला एनसीबीने अटक केली होती.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

लसीकरण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डोस घेणार का? सर्वसामान्यांना उत्सुकता

मराठवाड्यातील आणखी एका जिल्ह्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून नामांतर!