in

नवाब मलिकांनी केला समीर वानखेडेंचा आणखी एक फोटो शेअर, म्हणाले…

विभागीय संचालक समीर वानखेडे आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यामधील वाद मागील काही आठवड्यांपासून सुरु आहेत. त्यातच नवाब मलिक यांनी थेट समीर वानखेडेंचा निकाह नामाच ट्विट केला आहे. समीर हे मुस्लिम असल्याच्या आपल्या दाव्याला समर्थन करणारे ट्विट्स मलिक यांनी केले आहेत.

हा निकाह नामा समीर दाऊद वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा असून त्यांनी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी निकाह केलेला असं निकाहनामा शेअर करताना नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. या निकाह नाम्यामध्ये नवऱ्याचं नाव यापुढे समीर दाऊद वानखेडे असं लिहिलेलं दिसत आहे. तर त्या खाली नवरीचं नाव शबाना जाहीद कुरेशी असं लिहिलेलं आहे. तसेच मुलीच्या वडिलांचं नाव जाहीद कुरेशी असल्याचं या निकाह नाम्यावर लिहिल्याचं दिसत आहे. त्या खालोखाल दुसरा साक्षीदार म्हणून समीर यांची थोरली बहीण जास्मिन दाऊद वानखेडेंचे पती अजीज खानांनी यावी दुसरे साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केल्याचा दावा नवाब मलिक यांनी केलाय.

गुरुवारी, ७ डिसेंबर २००८ रोजी रात्री आठ वाजता समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह अंधेरी पश्चिमधील लोखंडवाला कॉम्पलेक्स येथे झाला होता, असा दावा नवाब मलिक यांनी एका ट्विटमध्ये केलाय. तसेच मेहर म्हणून ३३ हजारांची रक्कम घेण्यात आली होती, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. मलिक यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे सर्व माहिती त्यांनी पोस्ट केलेल्या निकाहनाम्यामध्ये दिसत आहे.

याचप्रमाणे नवाब मलिक यांनी एक फोटो ही ट्विट केलाय. मलिक यांच्या दाव्यानुसार हा फोटो या निकाहमधील असून फोटो दिसणारी व्यक्ती समीर वानखेडे आणि त्यांची पहिली पत्नी डॉ. शबाना कुरेशी आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Silver Rate Today | सोनेचांदी खरेदीचा आज शुभमुहूर्त?

देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ला सरकारकडून क्लीन चिट