in ,

‘महाराष्ट्राला रेमडेसीविर औषध मिळू नये, म्हणून भाजपा नेत्याचा प्रयत्न’

राज्यात कोरोना रूग्ण वाढत असतानाच रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. ब्रूक फार्मा कंपनीकडे रेमडेसीविर औषधांचा साठा करून ठेवल्याची माहिती मुंबईपोलिसांना मिळाली होती .यासंदर्भात ब्रूक फार्माचे राजेश डोकनिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली. यावर आता नवाब मलिकांनी ‘महाराष्ट्राला रेमडेसीविर औषध मिळू नये म्हणून भाजपा नेत्याचा प्रयत्न आहे असे म्हणतं भाजपावर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस कोणाची बाजू मांडत आहेत ? असा सवाल देखील केला.

नक्की काय आहे प्रकरण ?
राज्यात कोरोना रूग्ण वाढत असतानाच रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या संदर्भात दमणच्या ब्रूक फार्मा या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमडेसिव्हीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी याच कंपनीत जाऊन महाराष्ट्रासाठी काही इंजेक्शन्स बूक केली होती. या पार्श्वभूमीवर ब्रूक फार्माचे राजेश डोकनिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट पोलीस स्थानकात धाव घेतली. या दोन्ही नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर डोकनिया यांना पोलिसांकडून रात्री उशिरा सोडण्यात आलं आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona | बॉलिवूडमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव… ४थे नाव वाचून बसेल धक्का

‘मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर, मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते’