पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूप पुढे निघून गेले आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर मोदींचेच फोटो दिसतात. जिकडे पाहावं तिकडे मोदींचेच फोटो असतात. खादीच्या कॅलेंडरवर गांधींच्या जागी मोदींनी स्वत:चा फोटो छापला.
आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो आहे. हे अशापद्धतीनं चालत राहिलं तर नोटेवरून गांधींचा फोटो हटवून एकदिवस मोदीजी स्वत:चा फोटो छापतील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टोला लगावला आहे.
बंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या छायाचित्राला विरोध करण्यात येत आहे. यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिले आहेत.
Comments
Loading…