गृहमंत्री अनिल देशमुख हे नागपूरला होम क्वॉरंटाईन होते असं आम्ही कधीच म्हटलं नाही. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते नागपूरहून थेट मुंबईला आले होते. मुंबईत क्वारंटाइन असण्याच्या काळात ते कुणालाच भेटले नाहीत, असं सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. फडणवीसांचे हे सर्व आरोप नवाब मलिक यांनी आज खोडून काढले. फडणवीसांनी सांगितलेल्या पोलीस दलाच्या कामकाजातील दैनंदिन अहवालातील माहिती चुकीची असल्याचंही मलिक म्हणाले. फडणवीसांनी आज चुकीची माहिती दिली आहे. अनिल देशमुख यांना 5 तारखेला डिस्चार्ज मिळाला. त्यावेळी त्यांनी कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही. घरी जात येत असताना रुग्णालयाच्या गेटवर त्यांना पत्रकारांनी अडवले. थकवा होता म्हणून रुग्णालयाच्या गेटवरच बसून त्यांनी मीडियाशी संवाद साधला, असं सांगतानाच देशमुख हे नागपूरमध्ये क्वारंटाइन होते असं आम्ही म्हटलं नाही.
ते मुंबईत क्वॉरंटाईन होते. डिस्चार्ज झाल्यावर ते खासगी विमानाने मुंबईत आले होते. त्यानंतर मुंबईत त्यांच्या शासकीय निवासस्थानी 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत होते. या काळात ते कुठेही गेले नाहीत. कुणालाही भेटले नाहीत. सह्याद्रीवरही गेले नाहीत. त्या काळात त्यांची कोणतीही मुव्हमेंट झाली नाही. फक्त रात्री त्यांच्या बंगल्याच्या आवारात व्यायाम करायला जायचे एवढीच त्यांची मुव्हमेंट होती, असं मलिक म्हणाले.
Comments
Loading…