in

Navratri Garba : PPE किटपासून विद्यार्थ्यांनी तयार केला अनोखा ड्रेस

Share

गणेशोत्सवही अगदी साध्य पद्धतीनं देशभरात साजरा करण्यात आला तसंच यंदा नवरात्र आणि दिवाळीही अगदी साध्या पद्धतीनं घरी राहूनच साजरी करण्याचं आवाहन केलं जात आहे. गुजरातमध्ये मोठ्या संख्येनं दरवर्षी नागरिक गरबा खेळण्यासाठी एकत्र येतात मात्र यंदा कोरोनाचं सावट असल्यानं पारंपरिक पद्धतीनं गरबा खेळण्यावर बंदी आली आहे. अशा कोरोनाच्या कठीण काळातही नागरिकांना गरबा खेळण्यासाठी एका भन्नाट युक्ती शोधून काढली आहे.

सूरतमध्ये फॅशन डिझाइनिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गरबा खेळण्यासाठी एक युक्ती शोधली आहे. या विद्यार्थ्यांनी घागरा आणि पीपीई कीट घालून गरबा खेळला आहे. गुजरातमध्ये शारदीय नवरात्र 17 ते 25 ऑक्टोबरपर्यंत दरम्यान साजरी केली जाणार आहे. हा सूट फॅशन डिझाइनिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केला आहे. हा सूट घालून कोरोना काळात गरबा खेळता येईल. हा सूट घालून गरबा खेळल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी असेल असा दावा इथल्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

उत्तर प्रदेशात पोलीस अधिकाऱ्यांसमोर भाजपा कार्यकर्त्याने गोळ्या घालून केली हत्या

Maratha Community |’सारथी’ला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याचा सरकारचा निर्णय