in

नवरात्री 2020 घटस्थापना मुहूर्त: जाणून घ्या विधी आणि नियमआध्यात्म

Share

देवी दुर्गेच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शक्तिरुपाची पूजा करण्याचे ९ दिवस १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. भारतात नवरात्रीला विशेष महत्व आहे. नवरात्र सुरू झाल्यापासून ते दहाव्या दिवसापर्यंत सर्व घरांमध्ये विधीवत पद्धतीने दुर्गादेवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. हे नऊ दिवस हर्षोल्हासाने भरलेले असतात. रात्री जागरण असते, काहीकडे दांडियाही खेळला जातो.

यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सरकारने मंडप आणि सामूहिक दांडियावर बंधने घातली आहेत, पण लोक आपापल्या घरी हे नऊ दिवस पूर्ण उत्साहाने साजरे करू शकतात. हिंदू मान्यतांप्रमाणे नवरात्री वर्षातून चारवेळा येते ज्यात चैत्र आणि शारदीय नवरात्री विशेष महत्वाच्या असतात. तर दोन गुप्त नवरात्रीही असतात.

घटस्थानपेचा शुभमुहूर्त
हिंदू संस्कृतीमध्ये कोणतेही काम करण्याचाय एक शुभमुहूर्त असतो. त्याप्रमाणे घटस्थापनेचाही एक शुभमुहूर्त असतो. या वर्षी हा मुहूर्त पहिल्या दिवशी १७ ऑक्टोबर रोजी ०६:२७पासून ते सकाळी १०:१३पर्यंत असणार आहे. तर घटस्थापनेचा अभिजीत मुहूर्त सकाळी ११:४४पासून ते १२:२९पर्यंत असेल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच घटस्थापना केली जाते.

घटस्थापनेची सामग्री

  • पाण्याने भरलेला पितळे, चांदी किंवा तांब्याचा कलश,
  • पाणी असलेला नारळ,
  • नारळ गुंडाळण्यासाठी लाल रंगाचे कापड किंवा चुनरी,
  • कुंकू
  • पाच ते सात आंब्याची पाने,
  • कलश झाकण्यासाठी झाकण,
  • लाल धागा,
  • सुपारी, तांदूळ आणि नाणी.

नवरात्रीचे नऊ रंग (२०२०)

१७ ऑक्टोबर – प्रतिपदा – राखाडी (Grey)
१८ ऑक्टोबर – द्वितिया – केशरी/नारंगी (Orange)
१९ ऑक्टोबर – तृतिया – पांढरा (White)
२० ऑक्टोबर – चतुर्थी – लाल (Red)
२१ ऑक्टोबर – पंचमी – निळा (Royal Blue)
२२ ऑक्टोबर – षष्ठी – पिवळा (Yellow )
२३ ऑक्टोबर सप्तमी- हिरवा (Green)
२४ ऑक्टोबर – अष्टमी – मोरपंखी (Peacock Green)
२५ ऑक्टोबर – नवमी – जांभळा (Purple)

घटस्थापनेचा विधी
घराच्या आग्नेय दिशेला कोणत्याही जागी चांगली स्वच्छता करून घटाची स्थापना करा. ही दिशा पूजेसाठी सर्वोत्तम मानली जाते. कलश स्थापित करण्यासाठी मुहूर्तातच आधी श्रीगणेशाची पूजा जिथे कलशस्थापना करायची आहे तिथे एक स्वच्छ लाल कापड घाला आणि नारळावर कापड गुंडाळून कुंकू किंवा चंदनाने स्वस्तिक काढा. कलशात गंगाजल भरा आणि त्यात आंब्याची पाने, सुपारी, हळकुंड, दुर्वा आणि पैसे घाला.
जर कलशाच्या वर झाकण घालायचे असेल तर झाकणात तांदुळ घाला, अन्यथा कलशात आंब्याची पाने घाला. यानंतर कलशावर नारळ ठेवा आणि दिवा लावून पूजा करा. लक्षात ठेवा, देवीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूलाच कलशस्थापना करायची असते.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या ९ रुपांची पूजा केली जाते. १७ ऑक्टोबर रोजी देवी शैलपुत्रीची पूजा करतात आणि याच दिवशी घटस्थापनाही होते. १८ ऑक्टोबर म्हणजे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. १९ ऑक्टोबर रोजी देवी चंद्रघटेची, २० ऑक्टोबर रोजी देवी कुष्मांडाची पूजा होते. २१ ऑक्टोबर म्हणजे पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. २२ ऑक्टोबर रोजी देवी कात्यायनीची तर २३ ऑक्टोबर रोजी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. २४ ऑक्टोबर रोजी देवी महागौरीची आणि २५ ऑक्टोबर रोजी देवी सिद्धिदात्रीची पूजा होते.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

NEET Result | ‘नीट’चा निकाल आज होणार जाहीर

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी; सुप्रीम कोर्ट म्हणतं…