in

१२ जुलै रोजी सुरू होणार नाट्यगृह, रंगणार ‘शुभारंभाचा प्रयोग’?

Share

नुकतंच मनोरंजन विश्वात सगळ्या प्रकारच्या शूटचा श्रीगणेशा होताना दिसला. त्यानंतर आता रसिक प्रक्षकांना प्रतिक्षा आहे ते नाट्यगृह आणि सिनेमागृह कधी सुरू होणार याची. प्रेक्षक ही वाट पाहत असतानाच नुकतच एका पोस्टरने आणि व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. एक पोस्टर आणि व्हिडीओ क्लिप नुकतंच भेटीला आलं आणि आता लवकरच शुभारंभाचा प्रयोग रंगणार याची उत्सुकता वाढली. “शुभारंभाचा प्रयोग. तुमच्या सर्वात आवडत्या नाट्यगृहात. रविवार १२ जुलै, 2020” अशा आशयाच्या या पोस्टरने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाटक सुरु होणार ही गोष्ट सुखावणारी असली तरी या पोस्टर व क्लिपने अनेक प्रश्नही रसिकांच्या मनात उभे केले आहेत.

हे नाटक नेमके कोणते आहे? ते कोण दिग्दर्शित करत आहे? त्यातील कलाकार कोण? प्रेक्षकांनी ते नेमके कसे पाहायचे? लॉकडाऊनच्या या काळात सर्व चित्रपट-नाट्यगृहे बंद असताना सरकारकडून प्रयोगांना परवानगी कशी मिळाली? प्रयोगाला येणाऱ्या रसिकांच्या सुरक्षिततेचे काय? असे अनेक प्रश्न हे पोस्टर आणि क्लिप पाहिल्यानंतर मराठी नाट्यरसिकांच्या मनात उभे राहिले आहेत.

या सर्व प्रश्नांची उत्तरे रसिकांना लवकरच मिळणार आहेत. पुन्हा एकदा जोरदार एन्ट्रीसह तुमच्या आवडत्या आणि जवळच्या नाट्यगृहात १२ जुलै 2020 रोजी हा शुभारंभाचा प्रयोग होत आहे. रंगभूमीने अनेक आव्हाने पेलली, उलटवून लावली आणि ती नव्या उभारीने समर्थपणे उभी राहिली. आता तोच अध्याय पुन्हा एकदा गिरविला जाणार आहे. मायबाप प्रेक्षक मराठी रंगभूमीने पेललेल्या प्रत्येक आव्हानाच्यावेळी खंबीरपणे नाटकाच्या मागे उभे राहिले आहेत. यावेळीही ते या प्रयोगाच्या मागे उभे राहतील, याची पूर्ण खात्री ठेवत हा अनोखा प्रयोग सादर होणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Remembering the legendary Field Marshal #SamManekshaw on his death anniversary.

फील्ड मार्शल सैम मानेकशॉ यांच्या पुण्यतिथिनिमित्त श्रद्धांजली म्हणून अभिनेता विक्की कौशलचा नवा लूक रिलीज

अभिनेते सयाजी शिंदे यांचं अनोखं आवाहन; वारीनिमित्त झाडाला द्या आलिंगन