in

Nashik Forest | बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यु

लोकशाही न्यूजने इगतपरी तालुक्यातील जंगल परिसरामध्ये हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढत असल्याची बातमी प्रसारित केली या बातमीला एक दिवस पुर्ण होतो कि नाही तोच इगतपुरी तालुक्यातील कानडवाडीमध्ये बिबट्याने ३ वर्षाच्या मुलीवर हल्ला केला. यामुळे हिंस्त्र प्राण्यांचा मानवी वस्तीवरील हल्ल्याच्या घटनेत वाढ होताना दिसते.

मानवी लोकसंख्येत वाढ झाली आणि मानवाने आपल्या गरजांनसाठी जंगल संसाधनाचा वापर सुरु केला. अन्न, वस्त्र,निवारा मानवाच्या मुलभूत गरजा आहे. मानवी लोकसंख्या वाढल्याने निवाऱ्यासाठी मानवाने जंगल ओरबडायला सुरवात केली. परिणामी,जंगल क्षेत्रात घट झाली आणि जंगलातील प्राणी मानवी वस्तीत येण्याते प्रमाण वाढले. ‘वाघ तुमच्या घरात आला कि तुम्ही वाघाच्या घरात आला’ असा प्रश्न प्राणी प्रेमी नेहमी विचरत असतात.

पण आयुष्याची फक्त ३ वर्ष पाहीलेल्या इगतपुरीच्या कु, गौरी गुरुनाथ खडसे या मुलीवर बिबट्याने हल्ला करत तिचा फडशा पाडण्याचा प्रयत्न केला. गौरीला बिबट्याने जंगलाच्या दिशेने ओढत नेलं. आई,वडिल,आजोबा यांच्या समक्ष घटना घडल्याने त्यांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग केला. बिथरलेल्या बिबट्याने जखमी गौरीला झाडा-झुडपात सोडून धूम ठोकली.

सदर घटना समजताच इगतपुरी वन क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही ग्रामस्थांनी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्रथमोपचार घेऊन वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासठी नाशिक येथील जिल्ह्याग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु आज गौरीचा उपचारादरम्यान दुरदैवी अंत झाला . या घटनेमुळे इगतपुरी परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंआहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“मृत्यूचा सौदा करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान”

WTC Final Day 6 Live : भारताने घेतली 100 धावांची आघाडी