in

नशे सी चड गई..’ आईच्या बर्थडे पार्टीत रणवीरचा दीपिकासोबत बेधुंद डान्स

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) कधी कोणती स्टाईल करेन याचा काही नेम नाही. पण तो कधी कोणती गोष्ट करेन यावरही काही सांगता येत नाही. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात तो अगदी बेधुंद होऊन पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सोबत डान्स करताना दिसत आहे. नुकताच रणवीरच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यासाठी त्याने मुंबईतील एका आलिशान हॉटेल मध्ये नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसाठी लहानशी पार्टी ठेवली होती. नेहमी प्रमाणे तो आपल्या हटके आणि आगळ्या वेगळ्या शैलीत पार्टीलाही पोहोचला होता. यावेळी दीपिका देखील त्याच्यासोबत होती.

पार्टीत रणवीर बेधुंद होऊन नृत्य करत होता. ‘नशे सी चड गई’ या त्याच्यावरच चित्रित झालेल्या गाण्यावर त्याने अफलातून नृत्य केलं. दीपिका सोबत तो मस्ती करताना दिसला. मात्र दीपिकाने डान्स केला नाही. तर पूर्णवेळ ती रणवीरला पाहत होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तुम्ही ज्या शाळेत शिकला आहात ती शाळा आजूनही अबाधित आहे, संजय राऊत यांची रोखठोक भूमिका

नारायण राणेंवर शरद पवार म्हणाले…