in , ,

Naseeruddin Shah| अफगाणिस्तानवर मिळवलेला ताबा जगासाठीही धोका

सध्या जगभरात अफगाणिस्तानमध्ये घडत असलेल्या परिस्थितीवर बोललं जात आहे. तसेच जगभरातून टीकाही केली जात आहे. तालिबानने जबरदस्ती करत अफगाणिस्तानवर मिळवलेला ताबा जगासाठीही धोका निर्माण झाला असल्याचं सांगितलं जातं आहे.

पण काही भारतीय मुस्लिम तालिबानच काही दिवसांपासून समर्थन करत आहेत. काहींनी मीडिया समोरही याची कबुली दिली. नसीरुद्दीन यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते तालिबानच्या समर्थनावर रोष व्यक्त करताना दिसत आहेत.

भारतातच काही लोक हे तालिबानचं समर्थन करताना दिसत आहेत. जगभरातून अद्याप पाकिस्तान आणि चीन वगळता कोणीही तालिबानची पाठराखण केली नाही. मात्र भारतात काहीजण याचं समर्थन करताना दिसत आहेत. यावर अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. “सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता पुन्हा आली आहे. जगासाठी हा चींतेचा विषय आहे. मात्र भारतीय मुस्लिमांनी यावर जल्लोष साजरा करणं कमी धोकादायक नाही.असं नसिरुद्दीन शाहांनी म्हटलंय

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sidharth Shukla | इतक्या कोटींची संपत्ती मागे ठेवून गेला सिद्धार्थ शुक्ला

अनिल देशमुखांना मुंबई हायकोर्टाचा दणका; याचिकेवरील सुनावणीस नकार