in

Narendra Modi’s Birthaday| #राष्ट्रीयबेरोजगारदिवस हॅशटॅग चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७१ वा वाढदिवस आहे. परंतु युथ काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यासंदर्भातील आवाहन काँग्रेस आणि त्यांच्या समर्थकांकडून गुरुवार पासूनच केली जात होती. त्याचा परिणाम आज म्हणजेच मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिसून येत आहे. ट्विटरवर #राष्ट्रीयबेरोजगारदिवस हा हॅशटॅग ट्रेंड होत होता.

हॅशटॅगवर दीड लाखांच्या आसपास ट्विट सकाळी आठ वाजेपर्यंत करण्यात आले आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून २१ दिवसांचं सेवा आणि समर्पण अभियान सुरु करण्यात आलं असून त्यालाच विरोध करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलीय. कालावधीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून बेरोजगारीसारखा मुद्दा मोदींच्या वाढदिवसानिमित्त चर्चेत आणण्याचा प्रयत्न केला जातोय.

“बेरोजगारी वाढल्याने लाखो तरुणांवरील ताण वाढलाय. इंडियन युथ काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करणार आहे,” अशी घोषणा युथ काँग्रेसने केलीय. करोना काळावधीमध्ये ३२ लाख पगारी व्यक्तींनी रोजगार गमावला असून मोदींचे श्रीमंत मित्र अधिक श्रीमंत होत आहेत, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. “पकोडानॉमिक्स पुरे झालं आता येथील तरुणांना खरोखर नोकऱ्यांची गरज आहे,” असा टोलाही युथ काँग्रेसने लगावला आहे.


युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी ट्विटरवरुन आजचा दिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन करताना, “१७ सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार दिवस, निमित्त आहे कोट्यावधी तरुणांना बेरोजगार बनवणाऱ्या भारताच्या युवाविरोधी पंतप्रधान मोदींचा वाढदिवस,” असं ट्विट केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धुळ्यात आज महापौरपदाची निवड होणार

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास सुंदर आरास पाहा फोटो