in

पंतप्रधान मोदी आसाम, पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर…निवडणुकांमुळे मोठ्या घोषणांची शक्यता

लोकशाही न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. अनेक प्रकल्पांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम मोदी यांच्या हस्ते पार पडणार असून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने कंबर कसल्याचे समोर येते. मोदी उद्या पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे सभेला संबोधित करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांबद्दल ट्वीट करून त्यांनी माहिती दिलीय.

“आसाममधील जनतेमध्ये मोठा उत्साह पाहून आनंद वाटला. उद्या पुन्हा आसामला जाण्याची संधी मिळाली यामुळे मी खूश आहे. आसामच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करत राहू”, असे ट्वीट त्यांनी केले आहे. आपल्या ट्विटमध्ये मोदींनी काही फोटोही शेअर केले आहेत. यांमध्ये आसामच्या लोकांकडून त्यांच्या स्वागतासाठी करण्यात येत असलेली तयारी दिसत आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मंत्रालयाचा कार्यक्रम पार पडणार आहे. धोबी-दुर्गापूर नैसर्गिक गॅस पाईपलाईनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

भाजपाच्या ट्विटर हँडलवरुन पंतप्रधानांच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आलीय. मोदी पहिल्यांदा आसाममधील सोनितपूर येथे दोन रुग्णालयांचे भूमीपूजन करतील. तसेच असोम माला या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. राज्यातील महामार्ग आणि जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या निर्मितीचा हा कार्यक्रम आहे. त्यानंतर मोदी पश्चिम बंगालसाठी रवाना होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये हल्दिया येथे संध्याकाळी चार वाजता ते जनतेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर ४.४५ वाजता येथे ते काही महत्वाच्या योजनांचे भूमीपूजन करणार आहेत. पंतप्रधान दौऱ्याच्या प्रोटोकॉलनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, त्यांच्या उपस्थितीबद्दल अद्याप अस्पष्टता आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी भाषणात पंतप्रधांनांना खडे बोल सुनावले होते. त्यामुळे मोदी आणि बॅनर्जी ही भेट चर्चेचा विषय ठरली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमित शाह सिंधुदुर्गमध्ये दाखल; नारायण राणेंचं शक्तीप्रदर्शन

IND vs ENG : पंत-पुजरा यांच्यावर भारतीय संघाची मदार