in

PM Narendra Modi : ”18 वर्षावरील सर्वांचे मोफत लसीकरण करणार”

देशात आता 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणाला 21 जून पासून प्रारंभ होणार आहे. जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब कल्याण योजनेची मुदत दिवाळीपर्यंत वाढवली. यामध्ये नोव्हेंबरपर्यत 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच कोरोना काळात मृत्यू पावलेल्या नागरिकांना आदरांजली वाहिली. १०० वर्षातील सर्वात मोठी वैश्विक महामारी असल्याचं त्यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे..

 • देशात नव्या आरोग्य सुविधा उभारल्या
 • भारतात लस निमिर्तीच मोठ काम करण्यात आले.
 • देशात 23 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण
 • ज्यांना कोरोनाचा पहिला धोका त्यांचे आधी लसीकरण केले.
 • परदेशातून लस भारतात आणण्यात भर
 • लस बनवणाऱ्या कंपन्यांना सहकार्य केले.
 • देशात आता नेझल व्हॅक्सिनवर संशोधन सुरू
 • देशात सध्या 7 कंपन्यांकडून लस बनवण्याचे काम सुरू
 • मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबवली.
 • 1 मे पासून राज्यांना 25 टक्के अधिकार दिलेत.
 • राज्यांना आम्ही गाईडलाईन्स दिल्या.
 • लसीकरणाचा कार्यक्रम केंद्र सरकार अंतर्गत
 • 18 वर्षावरील सर्वांचे मोफत लसीकरण करणार
 • 18 वर्षावरील सर्वांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राची
 • 21 जूननंतर 18 वर्षावरील नागरिकांना मोफत लस देणार.
 • केंद्र सरकार राज्यांना मोफत लस देणार
 • गरीब कल्याण योजनेची मुदत वाढवली.
 • नोव्हेंबरपर्यत 80 कोटी नागरीकांना मोफत धान्य देणार

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे सर्वांच लक्ष… मराठा आरक्षणाची दिशा ठरणार?

जळगावमध्ये महावितरण कार्यालयात तोडफोड