in

“नरेंद्र मोदी चांगले, पण…,” प्रवीण तोगडिया म्हणाले…

भूपेश भारंगे | “पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत बसतच नाही. बसले तर समजावू शकतो ना.नरेंद्र मोदी माझे मोठे भाऊ आहेत. आमचे संबंध काही देखाव्याचे नाहीत. त्यांना राम मंदिरच्या सुरुवातीला बाबरी मशिदीसाठी लढणारा अन्सारी प्रिय वाटतो. मात्र राम मंदिरासाठी लढणारा प्रवीण तोगडिया आवडत नाही. त्यांना बाबूंनी बिघडवलं. ते खूप चांगले व्यक्ती होते.”, असा मिश्किल टोला प्रवीण तोगडिया यांनी लगावला.

वर्ध्यात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीनं कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आलं.या संमेलनात ते बोलत होते. “भारताचा इकॉनॉमिक मॉडेल बदलण्याची गरज आहे.यापूर्वी आता आपला जीडीपी खाली आला आहे. मात्र तो वाढत होता. एक टक्का जीडीपी वाढला तर एक कोटी रोजगार उपलब्ध झाले पाहीजेत. हे आंतरराष्ट्रीय गणित आहे. भारतात जे मॉडेल आहे. एक टक्का जीडीपी वाढताच एक कोटी रोजगार तयार होत नाहीत. ही जॉबलेस ग्रोथ आहे. जीडीपी वाढतो तेव्हा सरकारच्या कराच्या माध्यमातून मिळकत वाढते.”, असं मत प्रवीण तोगडिया म्हणाले .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी १ हजार ३६७ कोटींची तरतूद

Gaurav Dixit Arrested | अभिनेता गौरव दीक्षितला एनसीबीकडून अटक