विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेते आसाममध्ये सभा घेत आहेत. तर केंद्र सरकारने देखील आसाममध्ये योजनांचा पाऊस पाडायला सुरुवात केलीय. आसामकडे दुर्लक्ष झाल्याची ऐतिहासिक चूक आपले सरकार सुधारत असून विकासाला सरकारचे प्राधान्य असणार आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
केंद्रातील आणि आसाममधील भाजपच्या दुहेरी इंजिन असलेल्या सरकारांनी राज्य आणि उर्वरित देश यांच्यातील भौगोलिक आणि सांस्कृतिक अंतर कमी केले आहे. स्वातंत्र्यापूर्वी आसाममध्ये उच्च दरडोई उत्पन्न होतेय. मात्र १९४७ नंतर आसामच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आसामकडे दुर्लक्ष झाल्याची ऐतिहासिक चूक सुधारण्यास सुरुवात केली आणि आता भाजपाच्या सरकारचे राज्याच्या विकासाला प्राधान्य आहे, असे मोदी म्हणाले. मोदी यांच्या हस्ते गुरुवारी ३ हजार २३१ कोटी रुपयांच्या महाबाहू-ब्रह्मपुत्रा प्रकल्पाचे व्हर्चुअल उद्धाटन पार पडले.
Comments
Loading…