in

नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, कोरोना काळात अनाथ झालेल्यांसाठी १० लाखांचा निधी

कोरोना काळात दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना केंद्र सरकार १० दहा लाखांचा निधी देणार आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी मोठी घोषणा केलीय. या अनाथ मुलांना वयाच्या 18 वर्षी मासिक सहाय्यता राशी आणि वयाच्या 23 व्या वर्षी पीएम केअर्स फंडातून 10 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मुलांनी आपल्या आई-वडिलांना किंवा त्यापैकी एकाला गमावलं आहे. त्यामुळे अनेक मुलं अनाथ झाली आहेत. अशा मुलांना उभं करण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजने अंतर्गत या मुलांना आर्थिक मदत केली जाणार आहे.

पाच लाखांचा आरोग्य विमाही मिळणार

या अनाथ मुलांना मोफत शिक्षणासोबतच शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पीएम केअर फंडातून निधीची पूर्तता होणार आहे. या अनाथ झालेल्या मुलांना वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत आयुषमान भारत योजने अंतर्गत पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमाही दिला जाणार आहे. त्यासाठीचं प्रीमियम पीएम केअरमधूनच भरलं जाणार आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

OBC Reservation | “ओबीसींच्या आरक्षणावर घाला…हे भाजपाचं पाप”

Petrol Hike : इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेची बॅनरबाजी… भाजपा कार्यकर्तेही भिडले