in

Narendra modi birthday | पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या शुभेच्छांवरून राहुल गांधी ट्रोल

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७१ वा वाढदिवस असून त्यानिमित्त काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल नेटवर्किंगवरही मोदींच्या वाढदिवसाचीच चर्चा असल्याचं चित्र दिसत आहे. भाजपाकडून मोदींनी केलेल्या कामाचा पाढा वाचला जात असून मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसकडून १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. असे असतानाच राहुल गांधींच्या ट्विटने अनेकांचे लक्ष्य वेधून घेत असून त्यांच्यावर मोदी समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल नेटवर्किंगवर मोदी समर्थक विरुद्ध विरोधक असा सामना रंगल्याचे चित्र दिसत आहे. अशातच राहुल गांधींनी अगदी मोजक्या शब्दात मोदींना शुभेच्छा दिल्यात. वाढदिवसाच्या शुभेच्छा मोदी जी, असे चार शब्दांचे ट्विट राहुल यांनी इंग्रजीमधून केले आहे. राहुल गांधीच्या या ट्विटवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी शब्दांचा दुष्काळ पडलाय का ? असा खोचक सवाल विचारला तर काहींनी राहुल यांनी संसदेत मोदींना मारलेल्या मिठीचा फोटो पोस्ट केला आहे.

एकीकडे राहुल यांचे ट्विट चर्चेत असतानाच दुसरीकडे युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी ट्विटरवरुन आजचा दिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन करताना, ‘१७ सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार दिवस, निमित्त आहे कोट्यावधी तरुणांना बेरोजगार बनवणाऱ्या भारताच्या युवाविरोधी पंतप्रधान मोदींचा वाढदिवस,’ असे ट्विट केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आजी, माजी आणि भावी…! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावरून चर्चांना उधाण!

पॉझिटिव्हिटी रेट वाढत असला तरी घाबरायची गरज नाही