in

उद्यापासून नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा सुरु

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा उद्यापासून सुरु होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसांची ही यात्रा असणार आहे. या यात्रेदरम्यान नारायण राणे काय बोलतात? याकडे राजकीय लक्ष लागून आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा भाग सुरु ठेवण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा उद्यापासून सुरु होत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसांची ही यात्रा असणार आहे. यातील दोन दिवस राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात असणार आहे.

जन आशीर्वाद यात्रेमुळे गेल्या तीन दिवसात राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. त्यामुळे बालेकिल्ला समजल्या जामाऱ्या सिंधुदुर्गा शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमाचं नियोजन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार २७ ऑगस्ट रोजी ही यात्रा सिंधुदुर्गात येत असून रविवारी २९ ऑगस्ट रोजी यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रेचे नियोजन असे आहे, शुक्रवार दि. 27 ऑगस्ट रोजी सकाळी रत्नागिरी, सायंकाळी 4 वाजता खारेपाटण, तळेरे, वैभववाडी, फोंडा, त्यानंतर कणकवलीत स्वागत, विश्रांती. शनिवार दि. 28 ऑगस्ट रोजी कणकवली,नांदगाव, शिरगाव, तळेबाजार, देवगड, कुणकेश्वर, आचरा, मालवण, चौके, कट्टा, ओरोस, कुडाळ, कोलगाव, सावंतवाडी येथे त्या दिवशीचा समारोप होईल. त्या दिवशी राणेंची कणकवलीत विश्रांती. रविवार दि. 29 ऑगस्ट रोजी कणकवली-गोपुरी, कुडाळ एमआयडीसी, बांदा, आडारी एमआयडीसी, दोडामार्ग, सातार्डा, मळेवाड, शिरोडा, वेंगुले. जन आशीर्वाद यात्रा समाप्ती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्ध्यात तुरी कापण्याच्या यंत्राने युवा शेतकऱ्याचा मृत्यू

IND vs ENG 3rd Test Day 2 Live: इंग्लंडची 8 बाद 423 धावांपर्यंत मजल