राज्याच्या राजकारण सध्या एक शीर्षक खूप गाजतंय, ते शीर्षक म्हणजे एक शरद बाकी सगळे गारद. या शीर्षकावरुन आता नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. राजकरणात शरद पवारांसमोर कोण गारद असा प्रश्न विचारण्यात आला होता, यावर त्यांनी शिवसेना गारद असे म्हणत चांगलाच टोला हाणलाय.
नारायण राणे यांची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांना ‘एक शरद बाकी सगळे गारद’ या शीर्षकाखाली शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची घेतलेली मुलाखतीचा मुदा मांडत, यामध्ये कोण गारद असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर त्यांनी शिवसेनेला चांगेलचा टार्गेट केले. एक शरद आणि शिवसेना गारद असा शिवसेनेला शाब्दिक टोला लगावला आहे. तसेच शिवसेनेकडे माणसंच नाही आहे मुलाखतीसाठी त्यामुळे शरद पवारांना घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान पहिली ज्यांची मुलाखत यायची ती माहीत गोळा केलेली असायची. यामध्ये स्वत;चे विचार माहिती असे काय ? असा प्रश्न त्यांनी सेनेला विचारला. त्याचबरोबर मुलाखतीत पवार जे बोलतील ते राज्याच्या हिताचे असेलच असे म्हणून त्यांनी पवारांचा धोका नाकारला.
Comments
0 comments