in

राज्यातल्या ऑपरेशन लोटसला सुरूवात; नारायण राणेंनी फोडला नारळ

Share

राज्यात पुन्हा ऑपरेशन कमळची चर्चा गेल्या काही दिवंसांपासून सुरू झाली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत आघाडीचे सरकार कोसळेल असा संकेत खुद्द नारायण राणे यांनी वर्तवला आहे. या विधानावर राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी जरी उत्तर दिलं असलं तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपचा उंबरठा ओलांडला आहे, हे नक्की.

कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी रविवारी कोल्हापुरात केलेल्या या गौप्यस्फोटानंतर राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन कमळच्या चर्चांना उधाण आलं आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये सरकारं अस्थिर केल्यानंतर आता भाजपा महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ राबवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये ताळमेळ नसल्याची टीका करत भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी सप्टेंबरपर्यंत आघाडी सरकार कोसळेल असे संकेत दिले आहेत.

तर दुसरीकडे भाजपाकडून ही चर्चा पसरवली जात आहे. तसेच राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपाकडून होणारी ही चर्चा फेटाळतानाच, राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदारच पुन्हा स्वगृही परतण्यासाठी आतूर असल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे. शिवसेनेनंही मलिक यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातच समजेल की नेमकं कोणाची खुर्ची राज्याच्या सत्तेत टिकणार आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानात सत्तांतराच्या प्रयत्नानंतर महाराष्ट्रातही भाजपा आक्रमक होऊन ऑपरेशन कमळ राबवणार असल्याची चर्चा आहे. कोरोना काळ संपल्यावर हे घडू शकेल असे विधान कर्नाटकच्या मंत्री शशिकला यांनी केला होते. राज्यातील भाजपाच्या नेत्यांकडून विशेषत: देवेंद्र फडणवीसांकडून मात्र वारंवार असे कोणतेही प्रयत्न होणार नाहीत, असेही सांगण्यात येते आहे. भाजपा नेमके कोणत्या वेळी हे धक्कातंत्र अवलंबेल आणि शरद पवार, उद्धव ठाकरे ही परिस्थिती कशी हाताळतील, हेच पाहाणे आता गरजेचे आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

rajasthan

राजस्थानमध्ये राजकीय वादळ शमणार, गेहलोत-पायलट ‘सेटलमेंट’ होणार?

map

मराठी भूमिपुत्राने चेन्नई ते अंदमान टाकली केबल