in

Narayan Rane | नारायण राणेंनी अलिबाग पोलिसांकडे नोंदवला जबाब

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे अलिबाग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत दाखल झालेत.अलिबाग पोलिसांनी नारायण राणेंचा जबाब नोंदवला आहे.

महाड न्यायालयाने राणे यांना जामीन मंजूर केला होता…. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आणि सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अलिबाग येथील स्थानिक गुन्हे शाखेसमोर हजेरी लावण्याचे निर्देश कोर्टोने दिले होते. मागील तारखेला राणे स्वतः हजर न राहता वकील पाठवला होता. यावेळी राणे स्वतः हजर झाले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे अलिबागमध्ये दाखल झाले होते.गुन्हे शाखेचे पोलीस त्यांचा जबाब नोंदवून घेणार आहेत. गुन्हे शाखेबाहेर पोलिसांचा मोठा बंदोस्त तैनात आहे. राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच संदर्भातला जबाब नोंदवण्यासाठी अलिबागमध्ये पोहोचले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Hemant Nagrale | साकिनाका बलात्कार मृत्यूप्रकरणात अॅट्रॅासिटीचा गुन्हा दाखल

Bhayandar east