in

नानावटी रुग्णालयातून आली अमिताभ बच्चन यांच्या संदर्भातील सर्वात मोठी बातमी…

amitab bacchan
amitab bacchan
Share

मनोरंजन क्षेत्रातले बीग बी म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे सर्वांचे लाडके अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहेत. त्यांनी स्वतः आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली, सोबतच पुढील उपचारासाठी मी नानावटी रुग्णालयात दाखल होत आहे, त्यामुळे आतापर्यंत जे लोक माझ्या संपर्कात आले होते, त्यांनी स्वतःची कोरोना संदर्भातील चाचणी करून घ्यावी अशी विनंती केली आहे.

त्यापाठोपाठ अमिताभ बच्चन ज्या रुग्णालयात दाखल झाले आहेत, त्या नानावटी रुग्णालयातून सगळ्यात मोठी आणि दिलासदायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे आणि काळजी करण्याच कोणतंही कारण नाही.

बच्चन यांच्यावर उपचार करणाऱ्या टीममधले डॉक्टर बर्वे आणि डॉक्टर अन्सारी यांनी लोकशाही न्युजला दिलेला माहितीनुसार अमिताभ बच्चन यांनी वेळेतच तपासणी करून घेतली आणि रुग्णालयात दाखल झाले, त्यामुळे कोणत्याहीप्रकारची चिंता करण्याची गरज नाही. तसेच यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची कोरोना संदर्भातील चाचणी होईल, अशीही माहिती संबंधित डॉक्टरांनी लोकशाही न्युजला दिली

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

एक शरद आणि शिवसेना गारद -नारायण राणे

बिग बी नंतर अभिषेक बच्चनलाही कोरोना…रेखाचा बंगलाही कंटेनमेंट झोन…