संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षपदावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. त्यावरून काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
सोनिया गांधींनी प्रदीर्घ काळ यूपीएचे नेतृत्व खंबीरपणे केले आहे, पण सध्या त्यांची प्रकृती चांगली नसते. देशात सध्या अनेक घडामोडी घडत असताना काँग्रेसबाहेरील नेत्याने यूपीएचे नेतृत्व करावे अशी काहींची मागणी आहे, असे सांगतानाच खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. काँग्रेसने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नेतृत्व कोणी करावे, हे युपीएच्या सदस्यांनी ठरवलेले आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये असा सल्ला त्यांनी दिला तसेच संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत आणि त्यांना हा इशारा पुरेसा आहे, असे त्यांनी लोकशाही न्यूजशी बोलताना सांगितले.
Comments
Loading…