in ,

ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार, राणेंच्या भविष्यवाणीची नाना पटोलेंनी उडवली खिल्ली

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याची भविष्यवाणी केली होती. या भविष्यवाणीवर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

राणेंच्या या भविष्यवाणीची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खिल्ली उडवली आहे. भाजप हा खोटी भविष्यवाणी करणारा पक्ष आहे. त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ उरला नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

भाजपवाले भविष्यवाणी करणारे आहेत. त्यांची भविष्यवाणी खोटी निघत आहे. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. त्यांच्या भविष्यवाणीला अर्थ नाही. गेल्या दोन वर्षांपासून त्यांची भविष्यवाणी सुरूच आहे. आम्ही दोन वर्ष पूर्ण केले. आघाडी सरकार पाच वर्ष चालेल, असं पटोले म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस-भाजपा आमने-सामने; नाना पटोले म्हणाले…

MG Motors ठरली हाइब्रिड ऊर्जेचा वापर करणारी पहिली कार कंपनी