in

नाना पटोले काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष? लवकरच घोषणा

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी आजच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

नाना पटोले आज (4 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. यानंतर नाना पटोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भेट घेत आभार मानणार आहे. त्यानंतर आजच त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

“पक्षाने मला आदेश दिला. त्याचे मी पालन केले. पक्षाने सांगितलं त्याप्रमाणे मी राजीनामा दिला. मी मंत्रिपद किंवा कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही असे त्यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून आपल्याला पक्षाकडून काहीही सांगितलेलं नाही. पक्ष आदेश देईल. त्याचं मी पालन करेन” असे नाना पटोले म्हणाले.

नाना पटोलेंचे नाव का आघाडीवर?

नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही देखील आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सुनील केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडून नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींकडून प्राधान्य देण्यात येईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देशाच्या कण्यालाच ‘खलिस्तानी’ संबोधणे गैर, उर्मिला मातोंडकर यांचा कंगनावर निशाणा

पश्चिम बंगालमधील भाजपच्या रथयात्रेची सुनावणी ५ फेब्रुवारीला कलकत्ता उच्च न्यायालयात होणार