सध्या राज्यात आगीचं सत्र सुरूच आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. आग लागलेली दिसतानाच नाना पटोलेंनी आपला ताफा थांबवला.
भिवंडी जनसंपर्क दौरा आटोपून नाना पटोले रात्री 1.40 वाजता परत येत होते. यावेळी परळ येथील लंडन वाईन शॉपच्या इमारतीला आग लागली होती. ही आग दिसताच नानांनी आपला ताफा थांबवला. पोलीस प्रशासन आणि फायर ब्रिगेडला तत्काळ सूचना देण्यात आल्या. यानंतर संपूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली. यानंतर आग आटोक्यात येईपर्यंत नाना पटोले घटनास्थळीच होते. नानांच्या या तत्परतमुळे मोठी जीवितहानी टळली.
Comments
Loading…