in

काँग्रेसची धुरा नाना पटोलेंच्या हाती

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता राज्य काँग्रेसची धुरा विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हाती देण्यात आली आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीत याचा निर्णय झाला आहे. कालच नाना पटोले यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सुपूर्द केला होता. यानंतर चर्चेला सुरुवात झाली होती. आता पटोले पूर्णवेळ पक्षाची राज्यातील धुरा सांभाळणार आहे. नव्या अध्यक्षासोबतच सहा कार्यकारी अध्यक्षांची देखील नेमणूक झाली आहे. तसेच नव्याने १० प्रदेश उपाध्यक्ष देखील सक्रिय होणार आहेत.

राज्यात भाजपा सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात काँग्रेसमधून आऊटगोईंग झालं होतं. तसेच सध्या काँग्रेस सत्तेत असतानाही तिन्ही पक्षांमध्ये काँग्रेसला डावलल्याचा सूर उमटत असतो. अशा वेळी आता एका आक्रमक नेत्याकडे काँग्रेसची धुरा देण्याची मागणी कार्यकर्त्यांमधून होत होती. गेल्या पाच वर्षांत काँग्रेस पक्षाला बसलेल्या तडाख्यानंतर पक्षाला राज्यांतर्गत उभारणीची गरज होती. अखेर नाना पटोले यांच्यामार्फत पक्षाने ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.

नाना पटोले हे काँग्रेसमधील आक्रमक नेतृत्व आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसचे अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी त्यांचा पक्षाला फायदा होणार आहे. पटोले स्वत: ऑल इंडिया किसान काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यातच मराठवाडा आणि विदर्भातील ओबीसी राजकारण काँग्रेसच्या बाजूने वळाल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

कार्यकारी अध्यक्ष कोण?

1. शिवाजी मोघे (यवतमाळ)
2. बस्वराज पाटील (उस्मानाबाद)
3. नसीम खान (मुंबई)
4. कुणाल पाटील (धुळे)
5. चंद्रकांत हंडोरे (मुंबई)
6. प्रणिती शिंदे (सोलापूर)

काँग्रेसचे 10 नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष कोण?

1. शिरीष चौधरी (जळगाव)
2. रमेश बागवे (पुणे)
3. हुसैन दलवाई (मुंबई)
4. मोहन जोशी (पुणे)
5. रणजीत कांबळे (वर्धा)
6. कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद)
7. बी. आय. नगराळे
8. शरद अहेर (नाशिक)
9. एम. एम. शेख (औरंगाबाद)
10. माणिकराव जगताप (रायगड)

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इंधन दरवाढीवरून शिवसेना आक्रमक; राज्यभर तीव्र आंदोलन

कोणाबरोबरही फोटो काढण्यासाठी फडणवीस उपलब्ध; खुद्द भाजपा नेतेच सांगतायत