in

“मृत्यूचा सौदा करणारे मोदी जगातील एकमेव पंतप्रधान”

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. आद जळगावमध्ये त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारवर टीका सुरू असतानाच पटोले यांनी देशावर कोरोना काळात आलेली वेळ मानवनिर्मित असल्याचं सांगितलं.

पंतप्रधान हे भाजपचे आहेत, ते देशाचे नाहीत. त्यांनी देशाला कोरोनाच्या संकटात लोटले, मोदी यांनी ही परिस्थिती मुद्दाम आणली. हा प्लॅन असून, जागतिक पातळीवर हा प्लॅन झाला, असा आरोप त्यांनी यावेळी केला. जळगावमधील फैजपूर येथे बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

“चीनचे पंतप्रधान आणि नरेंद्र मोदी एकत्र आले होते आणि त्यानंतर १९ नोव्हेंबरला पहिला रुग्ण सापडला. हा जागतिक प्लॅन होता. आपल्या देशाच्या नागरिकांचा मृत्यूचा सौदा करणारे मोदी हे जगातील एकमेव पंतप्रधान आहेत,” असं म्हणत पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Indian Air Force | भारतीय हवाई दलात ‘मेगा भरती’

Nashik Forest | बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यु