in ,

अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपाचेच षङयंत्र, काँग्रेसचा आरोप

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे, पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही. तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांच्या शेअर्सचे दर बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी, यासाठी भाजपानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले यांनी यासंदर्भात प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संपर्क साधला. पटोले म्हणाले की, अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच त्यांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था असताना ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी? हा प्रश्न आहे. 2009मध्ये अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात ज्याचे नाव समोर आले, त्याचा मृत्यू दुसऱ्याच दिवशी झाला होता, याची आठवणही पटोले यांनी करून दिली.

राज्यातील आणि देशातील असलेल्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून भाजपानेच या मुद्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला असेही पटोले म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Rate : पाहा सोन्याचे आजचे भाव

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री LIVE : नाणार प्रकल्पाला पर्यायी जागा देऊ – मुख्यमंत्री