in

‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर वडिलांच्या आठवणीत रमले नाना पाटेकर

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘कोण होणार करोडपती’ला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत. ‘कोण होणार करोडपती’ मध्ये आठवड्यातून एक दिवस ‘कर्मवीर विशेष’ भाग असतो. पहिल्याच आठवड्यात शनिवारी, १७ जुलैच्या भागात पद्मश्री अभिनेते ‘नाना पाटेकर’ कर्मवीर म्हणून येणार आहेत. या विशेष भागात नानांनी आपल्या वडिलांची एक विशेष आठवण सांगितली. नानांच्या वडिलांबद्दल नाना कधी फार व्यक्त होत नाहीत, पण खेडेकरांनी त्या मुद्द्याला हात घालून नानांना बोलते केले. आपल्या वडिलांबद्दल बोलताना नाना भावुक झाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Tokyo Olympics | ऑलम्पिकनिमित्त पी. व्ही. सिंधूचं खास नेल आर्ट

zindagi na milegi dobara | जाणून घ्या चित्रपटातून आयुष्य जगण्याच्या ५ गोष्टी