in

Task force;नागपुरात अनाथ बालकांसाठी टास्क फोर्स गठीत

राज्य शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आता नागपूर जिल्ह्यात अनाथ बालकांसाठी टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे असणार आहेत. तर टास्क फोर्स अधिकारी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण आहेत. दरम्यान या टास्क फोर्समुळे अनाथ बालकांचे योग्यरीतीने संगोपन होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोविड -19 आजारामुळे अनेक बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत, तर काहींनी एक पालक गमावला आहे. या बालकांना दत्तक घेण्यासंदर्भात तसेच त्यांच्या नावावर पैसे घेण्याचे मेसेज सोशल मीडिया व्हायरल होत होते. या व्हायरल मेसेजमुळे अनाथ मुलांची तस्करी होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्कासह, संरक्षण, संगोपन करण्यासाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे. टास्क फोर्स अंतर्गत अनाथ बालकांचा शोध सुरू आहे.

दरम्यान आतापर्यत कोविड -19 आजारामुळे नागपुर जिल्ह्यात चार कुटुंबातील 13 बालकांनी दोन्ही पालक गमावले तर 440 बालकांनी एक पालक गमावला आहे. यापैकी दोन्ही पालक गमावलेल्या 13 अनाथ बालकांपैकी 7 मुलांना बालगृहात तर सहा मुलांना नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती मुश्ताक पठाण यांनी माहिती दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Vaccination | मुंबईत उद्या लसीकरण बंद

Oxygen tank leak; मिरजेत शासकीय कोविड रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती