in

Nagpur ‘honey trap’; साहिल सय्यदवरून राजकारण तापलं

Share

नागपूरमधील ‘हनी ट्रॅप’ ऑडिओ क्लिप प्रकरणात पोलिसांनी एका आवाजाचा खुलासा केला आहे. हा आवाज साहिल सय्यद नावाच्या व्यक्तीचा आहे.या व्यक्तीचा फोटो भाजपने राष्ट्रवादी सोबत असल्याचे व राष्ट्रवादीने भाजप सोबत असल्याचे व्हायरल करून गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे. मात्र नेमके हे काय प्रकरण आहे ? हा साहिल सय्यद आहे तरी कोण ? एका छोट्याश्या कार्यकर्त्यांमुळे प्रकरण का तापलय ते जाणून घेऊयात…

नागपूर महापालिकेतील काही भाजप नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा प्लॅन करण्यासंदर्भात दोन लोकांमधील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आहे. आतापर्यंतच्या तपासानुसार त्यामध्ये संभाषण करणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये एक व्यक्ती साहिल सय्यद आहे.4 जुलै रोजी एलेक्सिस रुग्णालयात महापालिकेच्या एका वादग्रस्त डॉक्टर्सच्या उपस्थितीत साहिल सय्यद याने डॉक्टर्सला जीवे मारण्याची आणि रुग्णालयाची भिंत बुलडोझर आणून पाडण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये साहिल सय्यद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून साहिल सय्यद फरार झाला होता.त्यांनतर आता ऑडिओ क्लिप प्रकरणात त्याच नाव समोर आलं आहे.

गृह मंत्री अनिल देशमुखांनी ही या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश दिले होते. आता त्याच प्रकरणात नागपूर पोलिसांनी मोठा खुलासा करत ऑडिओ क्लिप मधील एक आवाज वादग्रस्त साहिल सय्यद याचा असल्याचा दावा केला आहे. तसेच या क्लिप मध्ये आवाज असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला आम्ही ताब्यात घेतले असून लवकरच साहिल सय्यदला अटक करू असा दावाही पोलिसांनी केला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

महाविकासआघाडी सरकारमधल्या ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

राज्यभरात दूध आंदोलनाने घेतला पेट