अहमदनगर जिल्ह्यातून बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबाद मध्ये आलेल्या एका 23 वर्षीय परीक्षार्थी विद्यार्थ्याची महानगरपालिकेच्या मागील कब्रस्थानात येऊन हत्या करण्यात आली आहे, ही घटना सकाळी आठ वाजेच्या सुमारास समोर आली, विशेष म्हणजे आजच आठ वाजेच्या सुमारास या तरुणाची परीक्षा होती .विकास देवचंद चव्हाण असे या तरुणाचे नाव होते. हा तरुण अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते. या तरुणाचा हात कोपरापासून तोडण्यात आला असून, छाटून टाकलेला हात हा अद्यापही सापडला नाहीये .यासंदर्भात सिटी चौक पोलिस तपास करत आहेत.
Comments
Loading…