in

बीडमध्ये अंधश्रद्धेची परिसीमा : करणी केल्याच्या संशयातून चिमुकल्याची हत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अंधश्रद्धेच्या नावावर अघोरी प्रकार आजही घडत आहेत. पण बीड जिल्ह्यात एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. म्हशीवर करणी केल्याच्या संशयातून एका चिमुकल्याची हत्या केल्याचे समोर आले आहे.

बीडच्या रत्नागिरी गावात रोहिदास व देवईबाई सपकाळ या दाम्पत्याची म्हैस मरण पावली होती. शुभम ऊर्फ राज मोतीराम सपकाळ याच्या कुटुंबीयांनी काळी जादू केल्यानेच आपली म्हैस मेली, असा संशय सपकाळ दाम्पत्याला होता. बुधवारी सकाळी काही मुले खेळत असताना शुभमचा मृतदेह आढळला. त्याच्या गळ्याभोवती लालसर खुणा होत्या. त्यावरून त्याचा खून झाल्याचा संशय होता. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये शुभमचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले.

ज्या ठिकाणी त्याचा मृतदेह सापडला, त्या परिसरातील घरांचा व तेथील माणसांची माहिती घेतल्यानंतर रोहिदास व देवईबाई या दोघांना अटक केली. /e दाम्पत्याने खुनाची कबुली दिली. शाळेच्या मैदानात खेळत असलेल्या शुभमला आरोपींनी घरी नेले आणि त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत घालून शाळेजवळ फेकला. गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर, या दोघांना शुक्रवारी बीड न्यायालयात हजर केले. त्यावेळी ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“मुख्यमंत्री पदाचं स्वप्न नेत्यांनी नाही जनतेनं पहावं लागतं…”

इंग्लंड ८ बाद ५५५… जो रूटचा द्विशतकी दणका