in

मुंबईला वादळी पावसाने झोडपलं; कोकणाचा मुंबईशी संपर्क तुटला

Mumbai was lashed by torrential rains; The Konkan lost contact with Mumbai
Mumbai was lashed by torrential rains; The Konkan lost contact with Mumbai
Share

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने हाहाकार माजवला आहे. रोजच्याप्रमाणे मुंबईच्या काही सखल भागांसह इतर भागांतही पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईतल्या काही ठिकाणी वाहतुक कोंडी झाली आहे. त्यातच मरिन लाइन स्थानकाशेजारील असलेलं झाड लोकलच्या ओव्हर हेड वायरवर कोसळल्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे.

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबई आणि कोकणाला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे थेट कोकणाचा मुंबईशी संपर्क तुटला आहे. सोबतच मुंबईची लोकलही ठप्प झाली आहे.

राज्यभरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज दुपारनंतर जोर धरला आहे. दक्षिण मुंबईसह अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जोराचा वारा आणि पाऊस यामुळं अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. मागील काही तासांत मुंबईत तब्बल 150 मिमिपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर, पश्चिम द्रुतगती मार्गावर घडलेल्या अनेक घटनांमुळे मालाड परिसरात आजही वाहतूक कोंडी झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. मुसळधार पाऊस पडत असल्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सीएसटी ते कुर्ला दरम्यान पालिका शाळांमध्ये तात्पुरते निवारा ठिकाण सुरू करण्यात आले आहेत. असुरक्षित भागातील रहिवाशांचे या ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी पावसामुळे वित्तहानी झाली असली तरी या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मुंबईतल्या अनेक ठिकाणी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा, मरीन लाइन्ससह अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमलाही पावसाचा फटका बसला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

monsoon-rains-reuters

Ratnagiri rain Update : रत्नागिरीत पावसाने धोक्याची पातळी ओलांडली

Rainstorm in Palghar! If the rains continue like this, big damage can happen

पालघरमध्ये बचावासाठी एनडीआरएफच्या टीम दाखल