in

Mumbai Rape case | महाराष्ट्रातील महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका – चित्रा वाघ

मुंबईतील (Mumbai) अंधेरी परिसरातील साकीनाका येथे बलात्कार (Sakinaka Rape Case) झालेल्या त्या पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. पीडित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital Mumbai) पीडित महिलेवर उपचार सुरू होते. यावेळी हाराष्ट्रातील महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपा उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी दिली.

खरंतर मी आता निशब्द झाले, माझ्याकडे या विषयावर बोलायला शब्द नाहीत. ज्या पद्धतीने एका महिलेवर अत्याचार झाला, तो राक्षसी होता. मी डॉक्टरांशी आता बोलले, मी तिला त्या ठिकाणी बघून आले अक्षरश: तिचे आतडे कापले गेले, तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला गेला. ज्या पद्धतीमध्ये हे अत्याचार चालले ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आता आमचे शब्द संपले. महाराष्ट्र महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका.

हे मला सांगायचे गेल्या आठ दिवसांमध्ये आपण बघतोय किती अत्याचार झालेत. साडे तेरा वर्षाच्या मुलीवर ठाण्यासारख्या ठिकाणी अत्याचार झाले. आज सकाळीच अमरावतीमध्ये एका सतरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, सात महिन्यांची गर्भवती मुलगी तिने स्वतःला संपवून टाकलं.

साकीनाक्यातील महिला मृत्यूशी झुंज देत होती आणि आता तर तुम्ही तिला बघितलं, आपण काही करू शकलो नाही आहोत. आम्ही अलीकडे पलीकडे काही चालू शकले नाही आणि याच पद्धतीने त्याच्यामध्ये पद्धतीने या महिलेला मारले गेले ज्या पद्धतीने या महिलेवर अत्याचार झालेला आहे हे निश्चितपणे एका माणसाचे काम नाही.

राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्ष नाही. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला. अत्याचाराच्या या घटना थांबवण्यासाठी महिला अॅट्रोसिटी कायदा आणायला हवा, ज्याप्रमाणे अल्पसंख्याकांवर अन्यायासाठी कायदा आहे, तसाच महिला अॅट्रोसिटीचा कायदा आणा, त्यासाठी कमिट्या स्थापन करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

पीडितेवर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते मात्र, दुर्देवाने तिचा मृत्यू झाला. (Sakinaka rape case victim died) सैतानालाही लाजवेल असं कृत्य आरोपीने केलं होतं. पीडित महिलेला मारहाण करुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला होता. इतकेच नाही तर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकून गंभीर दुखापत केली होती.

आरोपीने केलेल्या या कृत्त्यात पीडित महिलेची अवस्था खूपच चिंताजनक होती. आरोपीने भररस्त्यात उभ्या असलेल्या टेम्पोत हे कृत्य केलं होतं आणि त्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुंबईत निर्भया घटनेची पुनरावृत्ती, तपासात समोर आली धक्कादायक माहिती काही वेळापूर्वीच पीडित महिलेच्या प्रकृतीची चौकशी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयात जाऊन केली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Sakinaka Rape : आरोपींना कठोर शिक्षा करणार – गृहमंत्री

आज दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन; वसई-विरार पोलीसांकडून मार्गदर्शक सूचना जाहीर