in

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रेलरची ट्रकला धडक

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोलीजवळ बोरघाटात ट्रेलर आणि ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ट्रेलरने ट्रकला जोरदार धडक दिल्यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या अपघातात ट्रकचा चालक जखमी झाला. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

महामार्ग पोलीस , आयआरबी , अपघातग्रसतांच्या मदतीसाठी टीम यांनी घटनास्थळी धाव घेतली . खोपोली नगर पालिका , आयआरबी , उत्तम स्टील व इतर अशा 6 फायर ब्रिगेडने शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आली आहे. आगीमुळे ट्रक मधील रसायनाने भरलेल्या ड्रमचे सातत्याने स्फोट होते. त्यामुळे आग विझवण्यात अडथळे येत होते . महामार्गावर आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दिसत होते. आगीवर पाण्याबरोबरच फोमचाही मारा करण्यात येत होता. बऱ्याच प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्याला दिलासा; कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढतेय…

मृत्यूनंतर बाळासाहेबांना काय उत्तर देणार? – दिवाकर रावते