लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भिक मागणारे दिसत असतात. मात्र आता भिकारीमुक्त मुंबई या उपक्रमाअंतर्गत मुंबई पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत भिकाऱ्यांना पकडून चेंबूरमधील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात त्यांची सोय करण्यात येत आहे. या भिकारीमुक्त मुंबईसाठी शहराचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी पुढाकार घेतलाय.
शहरातील सर्व पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून त्यांच्या अख्त्यारीत येणाऱ्या भागात भिकारी दिसल्यास त्याला थेट चेंबूरच्या भिक्षेकरी संस्थेत दाखल करण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे या सर्व भिक मागणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी देखील होणार आहे. यामार्फत सध्या मुंबईतील भिकाऱ्यांना पकडण्याची मोहीम सुरू झाली आहे. संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात ही मोहीम राबवली जाणार आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी लहान बालकांच्या तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. तसेच अनेक ठिकाणी मुलांचा वापर करून सहानुभुती मिळवण्यात येते. यासंबंधी टोळी देखील सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलीस भिकाऱ्यांना पकडत आहे.
Comments
Loading…