in

गणेशोत्सवासाठी मुंबईतून मनसेने सोडल्या विशेष बस

mns
Share

गणेशोत्सवासाठी मुंबईतून मनसेने विशेष बस सोडल्या आहेत. दादरहून या बस सोडण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी सेना यांनी बसची व्यवस्था केली होती.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेच्या वतीने कोकणात जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी बुकिंगची तारीखही जाहीर केली होती. त्यानुसार, १ ऑगस्टपासून बुकिंग सुरू करण्यात आलं होतं आणि आज बस सोडण्यात आल्या. मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह निवडक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

गाडीत प्रवेश करण्यापूर्वी सर्व प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासण्यात आले. तसंच मनसेच्यावतीनं प्रवाशांना सेफ्टी किटही देण्यात आलं आहे. यात मास्क, हातमोजे, सॅनिटायझर व बेडशीटचा समावेश आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या उपक्रमाला नागरिकानी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शवला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

yashwant boga

थरारक पाठलाग करुन अपहरणकर्त्यांच्या तावडीतून केली मुलाची सुटका

औरंगाबादेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना