in

Mumbai Local | मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी!

लोकशाही न्यूज नेटवर्क

लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली झाल्यानंतरही प्रवासावरील वेळमर्यादेमुळं अनेक मुंबईकर त्रस्त आहेत. कार्यालयं वेळेवर गाठता येत नसल्यानं व कामांचं वेगही मंद असल्यानं राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात नाराजी आहे. ‘लोकल ट्रेनसह मुंबईतील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत होणे हे कोरोना रुग्णांच्या संख्येवर अवलंबून आहे. आता सर्वांसाठी लोकल खुली होऊन आठवडा उलटल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही. पुढील १५ दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास लोकल ट्रेनच्या सध्याच्या वेळापत्रकात बदल केले जातील आणि मुंबईकरांना दिलास मिळेल,’ असं आज मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.

सध्या मुंबईतील लोकल ट्रेन सकाळी पहिल्या गाडीपासून सात वाजेपर्यंत, दुपारी १२ ते ४ या वेळेत आणि रात्री ९ नंतर सर्वांसाठी खुली आहे. त्यामुळं काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी कार्यालयांच्या वेळा बदलल्या गेल्या नसल्यानं मुंबईचे जनजीवन अद्यापही ट्रॅकवर आलेले नाही. कुठल्याही कामासाठी बाहेर पडताना सर्वसामान्यांना ट्रेनचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं लागत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काकाणी यांनी दिलेली माहिती महत्त्वाची मानली जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाविकास आघाडीचा दणका; सेलिब्रेटींच्या टि्वट्सची होणार चौकशी

भविष्यात भाजपा हा पक्षच उरणार नाही, नाना पटोलेंचे फडणवीसांवर टीकास्त्र