in

MI vs SRH : सनरायजर्स हैदराबादचा मुंबई इंडियन्सशी सामना

आयपीएल 2021 मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना रंगणार आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर दोन्ही संघादरम्यान हा सामना होणार आहे. या सामन्यात पहिला विजय मिळवण्याचा हैदराबाद संघ प्रयत्न करेल.

मुंबईने खेळलेल्या 2 सामन्यांपैकी एका सामन्यात हार तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबई संघ दुसऱ्या विजयाच्या आशाने मैदानात उतरेल.हैदराबाद वगळता सगळ्या संघांना विजयाची चव चाखली आहे. या सामन्यात पहिला विजय मिळवण्याचा हैदराबाद संघ प्रयत्न करेल.

मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या पीचवर एकूण 16 वेळा सामने झाले आहेत. त्यातील 8 सामने मुंबईने जिंकले आहेत तर 8 सामने हैदराबादने जिंकले आहेत. म्हणजेच दोघांचंही पारडं समसमान आहे. पाठीमागील मोसमातही पारडं समान राहिलं आहे. मागील मोसमात मुंबई हैदराबाद दोन वेळा आमने सामने आले. यातील पहिल्या सामन्यात मुंबईने 34 रन्सने विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात हैदराबादने मुंबईला 10 विकेट्सने पराभूत केलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sonu Sood Corona | बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह

Pandharpur Bypoll Election : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत दुपारपर्यंत 33.12 टक्के मतदान