in

आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात; मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुत आज सामना

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळविला जाणार आहे. चेन्नईतील चिन्नास्वामी मैदानावर हा सामना आयोजित आहे. या पर्वात मुंबईचा संघ लागोपाठ तिसऱ्यांदा आणि आयपीएलच्या इतिहासात सहाव्यांदा आयपीएल स्पर्धेचं जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. तर इतिहासातली पहिली वहिली ट्रॉफी आपल्या नावावर करण्यासाठी आरसीबीचा संघ उत्सुक असेल.

फलंदाजीची ताकद

मुंबईच्या संघातील सर्वच खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, क्विंटन डि कॉक, क्रिस लिनचा धडाकेबाज फलंदाजीत माहिर आहे. तर मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, इशान किशन, पांड्या ब्रदर्स पोलार्ड अशी दमदार खेळाडू आहेत. त्यामुळे एकूणच मुंबईची बॅटिंग लाईनअप तगडी आहे.

आरसीबीच्या ताफ्यात विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल अशा विस्फोटक खेळाडूंचा संघात भरणा आहे. तसेच फीन एलेन, रजत पाटीदार, मोहम्मद, काइल जमैसिन असे खेळाडू आहेत. तर देवदत्त पडीक्कल हा देखील युवा प्रतिभावंत खेळाडू आहे. गेल्या पर्वात त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्यामुळे संघाकडून यंदाच्या मोसमातही चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

गोलंदाजीची ताकद

मुंबईचा संघ गोलंदाजीत वरचढ आहे. यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट यांच्यासारखे दोन जागतिक दर्जाचे गोलंदाज मुंबईजवळ आहेत. तसंच कुल्टर नाईलचा देखील मुंबईच्या संघात समावेश आहे. अनुभवी पीयुष चावला आणि राहुल चाहरच्या फिरकीने मुंबईची गोलंदाजीची ताकद तगडी आहे.

तर आरसीबीच्या गोलंदाजीत केन रिचर्डसन, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, अॅडम झॅम्पा यांसारखे टी ट्वेन्टी स्पेशालिस्ट गोलंदाज संघात आहेत.

मुंबईचा रेकॉर्ड खराब

मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएलचा कप जिंकला आहे. मात्र इतक असूनसुद्धा सलामीचे सामने जिंकण्यात मुंबईचा रेकॉर्ड खराब आहे. मुंबई इंडियन्सने 2013 पासून आतापर्यंत एकदाही स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकलेला नाही. आयपीएल 2013 च्या मोसमातही मुंबईला आरसीबीच्या हातून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा त्या सामन्यात रिकी पॉन्टिंग मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. 2013 पासून आतापर्यंत आयपीएलचे 7 हंगाम संपुष्टात आले आहेत, परंतु मुंबई इंडियन्सने आजपर्यंत आयपीएलचा सलामीचा सामना जिंकलेला नाही. अशा परिस्थितीत आता 8 व्या हंगामात तरी हा इतिहास बदलतो की त्याची पुनरावृत्ती होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कुणाचे पारडे जड

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात झालेल्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये मुंबईचा संघ बंगळुरुवर वरचढ ठरला आहे. जर आपण दोन संघांमधील हेड टू हेड सामन्यांची तुलना केली तर 2008 पासून या दोन्ही संघांमध्ये एकूण 29 सामने खेळले गेले असून त्यात मुंबईने आतापर्यंत 19 सामने जिंकले आहेत. तर बंगळुरुने मुंबईविरुद्धचे केवळ 10 सामने जिंकले आहेत. सलग सामन्याबद्दल मुंबईने पाठीमागच्या 10 सामन्यांत बंगळुरुला 8 वेळा पराभवाची चव चाखायला लावली आहे.

हॅट्रिकवर मुंबईची नजर

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक वेळा म्हणजेच सहा वेळा आयपीएल जेतेपद जिंकले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात असलेल्या संघाने प्रथम 2013 मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. यानंतर मुंबईने 2015, 2017, 2019 आणि पुन्हा 2020 मध्ये आयपीएलचा करंडक जिंकला. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईला सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वात असलेल्या आरसीबीने आणखी एकदाही आयपीएल करंडक जिंकलेला नाही. दरवर्षी आरसीबीकडे विस्फोटक खेळाडू असतात पण तरीही शेवटच्या क्षणी हा संघ निर्णायक मॅच गमावतो. आरसीबीने आतापर्यंत 3 वेळा आयपीएलची फायनल खेळली आहेत, पण अंतिम सामना जिंकण्यात त्यांना यश आलेलं नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लस उपलब्ध करावी – सोनू सूद

Stock market: शेअर मार्केटमध्ये 154 अंकांंची घसरण