in

मुंबईमधील मानखुर्द मंडळा परिसरातील आग नियंत्रणात

लोकशाही न्यूज नेटवर्क

तब्बल 20 तासांनंतर मानखुर्दच्या गोदामांमधील आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आलं आहे. राज्यात आगीचे सत्र सुरूच आहे. शुक्रवार दुपारपासून या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात होते. अग्निशमन दलाच्या 30 हून अधिक बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

मुंबईमधील मानखुर्द मंडला परिसराला आग लागली आहे. परिसरातुन धुराचे लोट पाहायला मिळत आहे. अग्निशमन दलाच्या 30हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

 सिलिंडर आणि तेलाच्या ड्रम्सचा स्फोट झाल्याने आग आणखीनच भडकली. याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हापासून या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहे. रात्रभर सुरू असलेल्या प्रयत्नानंतर आग शमविण्यात मोठे यश आले. मात्र तरिही शनिवारी सकाळपर्यंतही बऱ्याच ठिकाणी आग धगधगत होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट, हवामान विभागाने दिला नवा इशारा

Live update : देशभरात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात