in

मुंबईत 26 वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईतील प्रसिद्ध नायर रुग्णालयामध्ये एका तरुण डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 26व्या वर्षी या डॉक्टरचा मृतदेह त्यांच्या खोलीमध्ये सापडला होता. अद्याप आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे.

डॉ. तुपे असं या डॉक्टरांचं नाव असून, नुकतेच त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते औरंगाबाद येथे गेले होते. औरंगाबाद इथून परतले, सोमवारी त्यांनी दिवसभर काम देखील केलं. संध्याकाळी त्यांनी त्यांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांनी एका अंमली पदार्थाचं सेवन करत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अग्निपाडा पोलीस ठाण्यात याप्रकणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डॉ. तुपे अॅनेस्थेशिया विभागात एमडीचे शिक्षण घेत होते. अद्याप डॉ. तुपे यांनी का आत्महत्या केली याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Virus | राज्यात पुन्हा कोरोनाची लाट

Ind Vs Eng : परतफेड… भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय