in

मुंबईच्या ‘या’ भागात वाढतो कोरोना;पाहा रेड झोनची यादी

Share

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. दिवसेदिवसे रुग्णांचा आकडा नवीन उचांक गाठत आहे. त्यामुळे दररोज शहरात नवीन रेड झोन व कंटेन्मेंट झोन तयार होत आहे. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढत चालली आहे. चला तर जाणून घेऊयात हे नवीन कंटेन्मेंट झोन आहेत काय ते…

मुंबईत 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेन या अंतर्गत या लॉकडाऊनमध्ये काही भागात सूट दिली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. या आधी धारावी झोपडपट्टी, वरळी कोळीवाडा यासारखे भाग हे सुरुवातीला कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. मात्र, आता या भागातील रुग्णसंख्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे.

मात्र, असं असलं तरीही मुंबई महापालिकेची चिंता काही कमी झालेली नाही. कारण आता मुंबईच्या कांदिवली, बोरीवली, मालाड, वांद्रे, मुलुंडं, भांडूप यासारख्या उपनगरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या संदर्भातील कंटेन्मेट आणि रेडची नवी यादी देखील जारी केली आहे. त्यामुळे आता या भागातील संसर्ग रोखण्याचं मोठं आव्हान पालिकेसमोर आहे. ( containment zone) या लिंकवर क्लिक करुन देखील आपण यादी पाहू शकता.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

बापरे…मृतदेह नेला टॅक्सीच्या टपावरून

Petrol-Diesel Price ;सलग 20 व्या दिवशी इंधन दरवाढ