in

मुंबई एटीएसकडून एक संशयित ताब्यात; सातवा संशयित पोलिसांच्या ताब्यात

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने विविध ठिकाणांहून सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव झाकीर असल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईत राहणारा होता. त्यातच आता महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून आणखी एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई रात्री उशिरा महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांनी केली आहे.

महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरी परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याचे नाव झाकीर असे आहे. या झाकिरचे आणि दिल्ली पोलिसांनी अटक केल्या सहा दहशतवाद्यांचे एकमेकांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसारच महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांनी झाकीरला ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी जान मोहम्मद याने झाकीरला मुंबईत स्फोटके आणि इतर शस्त्रे आणण्यास सांगितले होती, अशी माहिती एटीएसने दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जीएसटी बैठक; औषधांवर जीएसटी नसणार- अर्थमंत्री निर्मला सितारमण

‘…तर, भाजपातील नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील’